Breaking News

अन्नपदार्थ व्यावसायिकांना परवाना नोंदणी, नूतनीकरण बंधनकारक.


सांगली, दि. 24, नोव्हेंबर - सांगली जिल्ह्यात सर्व किराणा, घाऊक विक्रेते, वितरक, किरकोळ विक्रेते, उत्पादक, हॉटेल चालक, रेस्टॉरंट चालक, पान शॉप धारक, दुध, मासे विक्रेते, अन्नपदार्थ वाहतूकदार व इतर अन्नपदार्थ व्यावसायिकांना अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत व्यवसायासाठी परवाना, नोंदणी घेणे बंधनकारक आहे. तरी सर्व अन्नपदार्थ व्यावसायिकांनी परवाना, नोंदणी तसेच नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न) एस. बी. कोडगीरे यांनी केले आहे.

कोडगीरे म्हणाले, विनापरवाना अथवा विनानोंदणी व्यवसाय करणे हा अन्न सुरक्षा मानदे कायद्यांतर्गत गुन्हा असून कलम 63 नुसार सहा महिन्यापर्यंत शिक्षा व पाच लाखापर्यंत दंड होवू शकतो. उत्पादक, वितरक व घाउक विक्रेते यांना परवाना अट क 14 नुसार विनापरवाना अथवा विनानोंदणी धारकास अन्नपदार्थांची विक्री करणे किंवा विनापरवाना अथवा विनानोंदणी धारकाकडून अन्नपदार्थ खरेदी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 

परवाना घेतलेल्या ज्या अन्न व्यावसायीकांची परवाना मुदत 31 डिसेंबर पर्यंत संपुष्टात येते, अशा अन्न व्यावसायीकांनी परवान्याच्या नूतनीकरणासाठी योग्य त्या शुल्कासह 30 नोव्हेंबर पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर नुतनीकरणासाठी आलेल्या अर्जाबाबत अन्न सुरक्षा व मानदे नियमन 2011 नुसार दरदिवशी 100 रूपये इतके अतिरिक्त विलंब शुल्क आकारले जाईल.

सर्व व्यावसायीकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासनाने परवाना अथवा नोंदणीकरिता ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली असून षश्रीी.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर अर्ज करावा. अथवा सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली कार्यालयाशी संपर्क साधून, माहिती घेवून अर्ज करावे. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1800222365 किंवा 0233-2602202 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहनही कोडगीरे यांनी केले आहे.