Breaking News

वाशीमधील अरुणाचल भवनमध्ये आग

नवी मुंबई, दि. 07, नोव्हेंबर - वाशी मधील अरुणाचल भवनला आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागण्याची घटना घडली. दरम्यान या आगाीमध्ये कोणत्याही  प्रकारची जीवितहानी झालेली नाही. शॉटसर्किटमुळे आग लागण्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या पथकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
वाशी रेल्वे स्थानक परिसरातील अरुणाचल भवनच्या दहाव्या मजल्यावर आग लागली. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे 3 बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग  लागल्यानंतर भवनमधील नागरिकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. दहाव्या मजल्यावरुन ही आग आठव्या मजल्यावर पोहचली होती. अग्निशमन दलाच्या पथकांकडून एक  तासामध्ये आग आटोक्यात आणली गेली, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी प्रभाकर गाडे यांनी दिली.