Breaking News

तुळशीदास बोकंद पेन्शनर्स संघटनेच्या उपाअध्यक्षपदी

सात्रळ।प्रतिनिधी। राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील केंद्रमुख्याध्यापक तुळशीदास बोकंद यांची अहमदनगर जिल्हा पेन्शनर्स संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी राहुरी तालुका कार्यकारिणीच्या माध्यमातून सेवानिवृत्तांसाठी महत्त्वाचे काम केले आहे. 


त्यांना यापूर्वी सोनगाव येथे सेवा बजावत असताना गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. डाॅ. बाळकृष्ण, राज्य आदर्श शिक्षक राजेंद्र बोकंद व संजय बोकंद यांचे ते वडील आहेत. त्यांच्या निवडीबद्दल अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले, शिक्षक बॅकेचे चेअरमन रावसाहेब रोहकले, राहुरी शाखेचे संचालक साहेबराव अनाप सोनगावचे सरपंच राजेंद्र अनाप, रंगनाथ दिघे, जनार्दन दिघे, लक्ष्मण आप्पा शिंदे, निवृत्ती शिंदे आदींनी बोकंद यांचेअभिनंदन केले आहे.