राळेगणसिद्धी येथे भरणार आरोग्याचा महाकुंभ
पारनेर/प्रतिनिधी/- दि. 18 - विविध आजारांनी ग्रस्त असणाऱ्या आणि महागड्या आरोग्यसेवा परवडत नसलेल्या रुग्णांसाठी आता महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून उपचार करुन घेण्याची सोय उपलब्ध होणार आहे. रविवार,19 नोव्हेंबर रोजी राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे हा आरोग्याचा महाकुंभ आयोजित कऱण्यात आला. 50 हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी याठिकाणी होणार आहे.
देशभरातील नामांकित डॉक्टरांकडून या रुग्णांवर अत्यावश्यक उपचार तसेच गरज पडली तर शस्त्रक्रियाही मोफत केली जाणार आहे. या महाआरोग्य शिबीराची सर्व तयारी पूर्ण झाली असून रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत हे शिबीर होणार आहे. सकाळी 10 वाजता राज्याचे वैद्यकीय शिक्षण जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री गिरीष महाजन आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे हे आरोग्य शिबीरस्थळी भेट देणार आहेत.
मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शांतीनिकेतन क्रीडांगणावर हे महाआरोग्य शिबीर होणार आहे. यापूर्वीच नगर, श्रीगोंदा, पारनेर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण आरोग्य रुग्णालय, महापालिकांची रुग्णालये याठिकाणी 13 तारखेपासूनच रुग्णांची पूर्वतपासणी कऱण्यात आली आहे. असून 50 हजारांहून अधिक रुग्ण रविवारच्या शिबिरात नामांकित डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतील.

यावेळी महाराष्ट्र होमिओपॅथीक कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. अजित फुंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, राळेगणसिद्धीचे उपसरपंच लाभेश औटी आणि राळेगणसिद्धी ग्रामरक्षक दलाचे अध्यक्ष सुरेश पठारे यावेळी उपस्थित होते. आज या सर्वांनी महाआरोग्य शिबीराच्या तयारीचा आढावा घेतला.
जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद यांच्या सर्व यंत्रणा, आरोग्य विभाग आदी यांत सहभागी झाल्या असून हे महाआरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा थेट लाभ व्हावा, यासाठी या यंत्रणा कार्यरत आहेत. राळेगणसिद्धी येथे 20 एकर जागेवर शांतीनिकेतन क्रीडांगण येथे हे महाशिबीर आयोजित कऱण्यात आले आहे. याठिकाणी विविध आजारांनुसार वर्गीकरण करण्यात आले असून नावनोंदणी केल्यानंतर संबंधित रुग्णांना त्यांना आवश्यक उपचार आणि तपासणीसाठीच्या कक्षात पाठविण्यात येणार आहे. यासाठी 4 हजारांहून अधिक स्वयंसेवक याठिकाणी काम करीत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय स्तरावर जास्तीचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय (ससून रुग्णालय) पुणे, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय, अहमदनगर, गुणे आयुर्वेद महाविद्यालय, होमिओपॅथिक महाविद्यालय, अहमदनगर यांच्याकडून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. याशिवाय, विविध ठिकाणी शिकाऊ डॉक्टर्स यांचा या महाआरोग्य शिबीरात सहभाग असणार आहे. त्याशिवाय, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा असे विविध जणांना या नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करुन घेण्यात आले असून पूर्वतपासणी झालेली नसेल तरीही रुग्णांना थेट राळेगणसिद्धी येथे आल्यानंतरही आरोग्य तपासणी आणि उपचार करुन घेता येणार आहेत.
रविवारच्या महाआरोग्य शिबीरासाठी जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांसह जिल्हा रुग्णालय, महापालिका दवाखाने, जिल्ह्यातील 4 ग्रामीण रुग्णालये आणि 23 प्राथमिक आरोग्य केंद्र, 123 उपकेंद्रांच्या स्तरावर रुग्णांची पूर्वतपासणी करण्यात आली. तब्बल पंधराशेहून अधिक तज्ज्ञ डॉक्टर्स रविवारच्या या शिबीरात तपासणी करणार आहेत. त्यासाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध करण्यात आला असून विभागनिहाय त्याचे वाटप करण्यात आले आहे. शिबिरात येणाऱ्या रुग्णांसाठी विविध आजारनिहाय नावनोंदणी कक्ष, 120 बाह्यरुग्ण कक्ष, औषध वाटप कक्ष आदी या ठिकाणी असणार आहेत.