मुख्यमंत्रीच्या त्या कथित वक्तव्याचा निषेधार्थ नेवाशात मोर्चा
यावेळी बोलताना दिलीप शिंदे म्हणाले, आमचा समाज शांतताप्रिय आहे.तेवढाच तो विश्वासु देखील,म्हणुनच छत्रपती शिवजी महाराजांनी जिवाजी महालेंना अंगरक्षक नेमले होते.आजही ग्राहक विश्वासानेच आपले शिर व मान आमच्या हातात हत्यार असताना देतात.पैशासाठी लाजिरवाणे जिणे जगणारी आमची जात नाही,म्हणुनच आम्हाला नाभिक म्हणतात.हे लक्षात असु द्या.जाहिर सभेत टर उडवली, अवमान कारक बोल लावले आता जाहिर माफी मागा .अन्यथा सकल नाभिक समाज शांत राहणार नाही, आगामी निवडणुकित याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा हि देण्यात आला .
यावेळी बापुसाहेब भागवत, आप्पासाहेब गायकवाड, एकनाथ वाघ आदींनी मनोगत व्यक्त केले. राज्य उपाध्यक्ष बापुसाहेब भागवत, जिल्हा संघटक अशोक पंडीत, नेवासा तालुका अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड, नेवासा तालुका कार्याध्यक्ष शरद कदम, नंदकुमार औटी, विशाल वाघ, वामन अटी, रामेश्वर पाडव, बाळासाहेब क्षीरसागर, भास्कर वाघमारे, सोमनाथ गायकवाड, आशोक शेजुळ, हरिदास शिताळे, प्रविन कोरडे, मंगेश बोरूडे, दिपक पंडीत, दत्तात्रय भागवत, विकास शिंदे, श्रीराम वाघ, केदार पाडव, राजेंद बनबेरू, योगेश कोरडे आदी उपस्थित होते
