Breaking News

अखेर 'त्या' भोंदूबाबाची रवानगी कारागृहात


धार्मिक विधीत बाधा आल्याची धमकी देत रोकडसह दागिने घेऊन युवतीस चोरी करण्यास भाग पाडणाऱ्या भोंदूबाबास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. 

ठाणे स्थित उदयराज रामआश्रम पांडे असे भोंदूबाबाचे नाव आहे. गृहशांती आणि कौटुंबिक कलह दूर करण्यासाठी केलेल्या धार्मिक पूजेत बाधा आल्याने त्याने शहरातील तरुणीस गंडविले होते. पूजाविधी पूर्ण करण्याचा आग्रह धरीत त्याने युवतीच्या वडिलांसह कुटुंबीयांचा घातपात करण्याची धमकी दिली होती. 


त्यामुळे भेदरलेल्या तरुणीने चार लाख रुपयांची रोकड आणि १५ तोळे सोन्याचे दागिने भोंदूबाबाच्या स्वाधिन केले होते. त्यामुळे लालसेपोटी त्याने युवतीस चोरी करण्यास भाग पाडल्याने त्याचे पितळ उघडे पडले होते. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या.