Breaking News

सनी लिओनीशी पंगा पडेल महागात !

अभिनेत्री सनी लिओनीचा नुकताच एक व्हिडीओ सोशल साईट्सवर व्हायरल होत आहे. ज्यात सनी धमाल मस्ती करताना दिसतेय. तर एका व्हिडीओत ती घाबरलेलीसुद्धा पाहायला मिळाली आहे. ते झालं असं की, सनी वाचत बसलेली असतानाच टीममधील एका सदस्याने तिच्या अंगावर टाकायला साप आणला. पाठमोऱ्या सनीला याची कल्पना नव्हती. तेव्हा त्याने तो साप तिच्या अंगावर सोडला. 


तेव्हा मात्र ती खूप घाबरली आणि पळत सुटली. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ पाहायला मिळतो. त्याचसोबत आणखी एक व्हिडीओ पाहायला मिळाला आहे ज्यात सनी तिच्या अंगावर साप सोडणाऱ्या व्यक्तीच्या मागून हळूच येऊन त्याच्या दोन्ही गालावर केक लावून पळून जाते आणि म्हणते हा आहे माझा बदला... हे दोन्ही व्हिडीओ शेअर करत सनीने त्याखाली एक कॅप्शनसुद्धा दिली आहे. ज्यात 'माझ्याशी केलेली मस्करी तुम्हाला महागात पडू शकते' असे तिने म्हटले आहे. सनीचे हे दोन्ही व्हिडीओ सोशल साईट्सवर चांगलेच गाजत आहेत