Breaking News

कांद्याच्या दरात मोठी घसरण

लासलगाव : आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी लाल कांद्यात सरासरीमध्ये ७९० रुपये प्रतिक्विंटल घसरण झाली.

सोमवारी लासलगाव बाजार समितीत १९,७०० क्विंटल कांद्याची आवक झाली. लिलावात लाल कांद्याला कमीतकमी १५००, जास्तीतजास्त ३७१५, सरासरी २७१२ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. उन्हाळ कांद्याला सोमवारी सरासरी ३५०१ प्रतिक्विंटल, तर मंगळवारी सरासरी २७१२ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सरासरी ७९० रुपये प्रतिक्विंटल घसरण झाली..