सोयाबीनच्या दरात 300 रुपयांपर्यंत वाढ होणार - पाशा पटेल
लातूर, दि. 19, नोव्हेंबर - येत्या दोन दिवसांत सोयाबीनच्या दरात सोयाबीनच्या दरात 120 ते 300 रुपयांपर्यंत वाढ होणार असल्याची खुशखबर राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली़ यामुळे हे दर हमीभावाच्या जवळपास पोहोचतील़ केंद्र सरकारने खाद्यतेलावर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क वाढविल्याने हे दर वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह, रामविलास पासवान, पंतप्रधानांचे सचिव यांची बैठक झाली़ त्या बैठकीत आम्ही खाद्यतेलावर आयात शुल्क वाढविण्याची शिफारस झाली असल्याने गडकरी यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय झाल्याचे पटेल यांनी सांगितले. सगळयाच तेलावर आयात शुल्क वाढणार आहे., शेतक-यांच्या हितासाठी आपण मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे़ त्यामुळेच चार महिन्यांत सात निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत़, असे ते म्हणाले.
