Breaking News

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सीईओपदी प्रतापसिंह चव्हाण

सांगली, दि. 03, ऑक्टोबर - सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रतापसिंह चव्हाण यांच्या नियुक्तीचा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत क रण्यात आला आहे. त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र पाठविण्यातही आले आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली. प्रतापसिंह चव्हाण सध्या क ोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत गत दोन वर्षापासून मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त आहे. या पदावर सक्षम अधिकार्याची तातडीने नियुक्ती करावी, अशी सूचना रिझर्व्ह बँकेने केली  होती. त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेला तीन ते चार स्मरणपत्रेही पाठवली होती. अशातच जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील अधिकारी- कर्मचारी भरतीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्य कार्यकारी अ धिकारी पद भरणेही गरजेचे होते. त्या अनुषंगाने संचालक मंडळाने प्रत्यक्ष कार्यवाहीस सुरूवात केली होती.
जिल्हा मध्यवर्ती बँक मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी बँक प्रशासनाने जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यावेळी बँकिंग क्षेत्रातील 29 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यात गत दोन  वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. रामदुर्ग व त्यांना सहाय्य करणारे सरव्यवस्थापक मानसिंग पाटील  यांचाही अर्ज होता. या अर्जांबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र बहुतांश संचालक व निवड मंडळास यातील कोणताही इच्छुक सक्षम वाटला  नाही. त्यामुळे संचालक मंडळाने नव्या नावाचा शोध सुरू केला होता.
ही शोधमोहिम प्रतापसिंह चव्हाण यांच्या नावावर येऊन थांबली. त्यांच्या नावाला सर्वांनीच संमती दिली. त्यानुसार संचालक मंडळाच्या बैठकीत प्रतापसिंह चव्हाण यांच्या नियुक्तीचा  ठराव करण्यात आला व तशा आशयाचे अधिकृत नियुक्तीपत्र प्रतापसिंह चव्हाण यांना पाठविण्यात आले. पुढील आठवड्यात प्रतापसिंह चव्हाण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यक ारी अधिकारीपदाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता व्यक्त होत आहे.