Breaking News

पर्यावरण संमेलनात रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव

रत्नागिरी, दि. 03, ऑक्टोबर - राळेगणसिद्धी येथे नुकत्याच पार पडलेल्या दुस-या पर्यावरण संमेलनात रत्नागिरी जिल्ह्यातील संतोष कडवईकर (परचुरी शाळा क्र. 2), मधुरा  सोहनी (कुटरे बौद्धवाडी शाळा नं. 1) आणि दीपक मोने (कोळकेवाडी शाळा नं. 1) यांना ’पर्यावरणपूरक शाळा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. 
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने राळेगणसिद्धी येथे दुसरे पर्यावरण संमेलन पार  पडले. संमेलनाचे अध्यक्षद पद्मभूषण अण्णा हजारे यांनी भूषविले. संमेलनाला 27 जिल्ह्यांतून 315 प्रतिनिधी उपस्थित होते. मंडळाचे सचिव धीरज वाटेकर यांनी प्रास्ताविकात निसर्ग  व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या कामाचा आढावा घेतला. तसेच कोकणातील कामाची माहिती दिली. राळेगणच्या ग्रामस्थांनी अडीच-तीन लाख झाडे लावून जगवली  आहेत. त्यामुळे गावात डॉक्टरांना फारसे पेशंट मिळत नाहीत. येत्या शतकभरात समुद्रकाठच्या शहरांना धोके निर्माण होणार आहेत. त्यामुळे पर्यावरण कार्यकर्त्यांनी ध्येयवादी बनून क ाम करावे. मनुष्य जन्म सेवेसाठी आहे, असे आवाहन अण्णा हजारे यांनी यावेळी केले.
संमेलनात पर्यावरण संवर्धन : जाणीव आणि कर्तव्य या विषयाला वाहिलेल्या ’शोधांकन’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. देशभरात स्वखर्चाने चंदन लागवड अभियान राब विणारे महेंद्र घागरे व कोकणात राबविलेल्या उपक्रमांसाठी कोकण विभागाला पंचवीस हजार रुपयांचा धनादेश अण्णा हजारे यांच्या हस्ते देण्यात आला. घागरे यांनी हा धनादेश  मंडळाच्या पर्यावरण कार्यासाठी आबासाहेब मोरे यांच्याकडे दिला.