सत्तेला ना कुणाचे भय ना कशाची लाज
दि. 06, नोव्हेंबर - सत्तेच्या रसायनात घुसळून निघाल्यानंतर समतोल सांभाळणे येर्या गबाळाचे काम नव्हे.इथे जातीवंत राजकारणी हवेत.अलिकडच्या काळात सत्तेच्या धुंदीत वावरत असतांना हा समतोल साधणे सर्वांनाच जमते असे नाही.सत्तेच्या भोवर्यात सापडलेल्या अनेक दिग्गजांना अनेकदा गटांगळ्यात खात राजकीय आत्महत्या करण्याची नौबत आल्याची अनेक उदाहरण आहेत.सत्ता असतांना केलेला माज कधी कधी जीभेवरून घरंगळला तर त्याची मोठी किंमत मोजावी लागते.
आजपर्यंत राजकारणात जीभेवरून घरंगळणार्या सत्तेच्या माजामुळे अनेकांना सत्तेचे बलीदान करावे लागले आहे.अगदीच माज या शब्दात संभावना करणे अतिशोयोक्ती ठरू शकेल अशा तत्कालीन प्रसंगांची खिल्ली उडविणारे नेते मंडळींचे वक्तव्य राजकारणात खळबळ माजविणारे ठरले,त्यातून पक्षाचे प्रतिमा हनन तर झालेच शिवाय पदही सोडण्याची नामुष्की ओढवली.
उदाहरण द्यायचे झाले तर महाराष्ट्राचे एका राञीत मुख्यमंञी झालेले बाबासाहेब भोसले इतिहासातील सर्वात विनोदी मुख्यमंञी म्हणून चर्चेत होते.त्यांची प्रत्येक घोषणा,प्रत्येक वाक्य विनोद समजून हास्यास्पद ठरू लागल्याने तत्कालीन पंतप्रधान इंदीरा गांधी यांनी त्यांना पायउतार केले.
त्यानंतर मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंञी विलासराव देशमुख यांनी पंचतारांकीत हाटेलला सुपुञासोबत दिलेल्या भेटीचा जाणते अजाणतेपणे झालेला इव्हेंट आणि तत्कालीन गृहमंञी रावसाहेब पाटील यांच्या तोंडून निघालेले बडे बडे देशोंमें ऐसी छोटी छोटी बाते होती हे वक्तव्य किती महागात पडले याविषयी वेगळे सांगण्याची गरज नसावी.
सांगायचे तात्पर्य हे की सत्तेवर असलेली माणसं प्रसंगाचं भान ठेवत नाही.त्यातून कळतनकळत अबोल माज देहबोलीतून व्यक्त होतो.या ठिकाणी नमूद केलेल्या घटना म्हटलं तर तशा अदखलपाञ आहेत.त्यानंतर अजित पवारांनी धरणात केलेली लघूशंका या राज्यात सत्तांतर होण्यास कारणीभूत ठरलेल्या अनेक घटनांमधील एक महत्वाची घटना ठरली.आज महाराष्ट्राची सत्ता स्थाने उबविणार्या मंडळींनी तेंव्हा या वक्तव्यावर केलेला आकांडतांडव आजही जनता विसरली नाही.अशा जातकुळीतील वक्तव्यांचा जाहीर निषेध करून सत्तेचा सोपान गाठणारे हा इतिहास लिहून पुर्ण होण्याआधीच विसरल्याचे दिसते.
सत्तेची नशा इतक्या लवकर या मंडळींना बेताल करण्यास कारणीभूत ठरली.यावरून सत्तेचे हे रसायन पचविण्याची क्षमता येण्याइतपत या मंडळींची पचनेंद्रीये परीपक्व झाली नाहीत असेच म्हणावे लागेल.
या आधीच्या सरकारमधील जबाबदार मंडळींनी केलेल्या वक्तव्यांचे सर्व पातळीवरील विक्रम आजच्या सत्ताधार्यांनी मोडीत काढले आहेत.केंद्र आणि राज्यातील मंञ्यांमध्ये वादग्रस्त वक्तव्य करण्याची अलिखीत स्पर्धा सुरू झाल्याचे दिसते आहे.अनेक केंद्रीय मंञ्यांनी शेतकर्यांच्या परिस्थीतीवर निर्लज्जपणे केलेले वक्तव्य असोत नाहीतर सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी बळीराजाला दिलेली साल्याची उपमा असो सारे सत्तेच्या नशेत तोल जाण्याची उदाहरणे आहेत.
राज्याचे जलसिंचन मंञी गिरीश महाजन यांनी तर या स्पर्धेत थेट सुवर्ण पदक प्राप्त वक्तव्य करून सत्तेचा काकटेल दाखविला आहे.दारु विक्री वाढवायची असेल तर दारुला महिलांचे नाव द्या असा सल्ला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सातपुडा साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाला जाहीर सभेत दिला. महाराजा पेक्षा महाराणी असृ नाव सुचवून या विद्वान मंञी महोदयांनी विमल ,केसर या बंदी असलेल्या गुटख्याच्या विक्रमी खपाचे मुक्तहस्ते कौतूक केले.महीलांविषयी या सत्ताधार्यांमध्ये कोणता आणि किती आदर आहे ,महीलांचा आदर करण्या संदर्भात या मंडळी कसले संस्कार झाले आहेत याचे प्रमाण मंञी महोदयांनी आपल्या वक्तव्यातून दिलेत.भान हरपलेल्या अवस्थेत बोलतांना मंञी महोदयांनी आपल्या सरकारचा नाकर्तेपणाही बोलून दाखविला.या राज्यात विमल,केसरी ब्रँडच्या गुटख्यावर बंदी आहे.याचा पुनरूच्चार करीत मंञ्यांनीच विक्रमी खपाचा दाखला दिला.केवळ महिलांचे नाव आहे म्हणून विक्रमी खप होतो असे तारेही तोडले.काय म्हणायचे या विद्वत्तेला?
यातून एकच गोष्ट मान्य करावी लागेल की सत्तेला ना कुणाचे भय असते ना कशाची लाज.....
स्री अस्मितेचेही सिंचन,....,.
सत्ता मिळाली की एव्हढी बुध्दी भ्रष्ट होते का.......
म्हणे महाराजा नको महाराणीच बरी......
विमल,केसर बंदी असूनही विकले जातात म्हणे....
माहीत असूनही कारवाईचं धाडस नाही..
झालयं तरी काय कमळाबाईच्या लेकरांना.....नुसतच बरळतया