श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवून तर दाखवा : फारूख अब्दुल्ला
श्रीनगर : हिंमत असल्यास श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावून दाखला’’,असे वादग्रस्त विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी केले आहे. कठुआच्या दौ़र्यावर असताना फारूख अब्दुला यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.
काही दिवसांपूर्वी फारूख अब्दुल्ला यांनी पीओके हा पाकिस्तानचा भाग असून तो कोणी हिस्कावून घेऊ शकत नाही,असे विधान केले होते. यावरून त्यांच्यावर चौफेर टीकादेखील झाली होती. पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानाचाच हिस्सा आहे आणि यावरून भारत - पाकिस्तानमध्ये कितीही युद्ध झाले तरीही ही स्थिती बदलणार नाही,असे विधान फारूख अब्दुल्ला यांनी केले होते. आता पुन्हा त्यांनी वादग्रस्त विधान केल्याने आणखी वाद चिघळण्याची शक्यता आहे.