Breaking News

ग्राहकांना पावती द्यावी; गॅस ग्राहक संघाची मागणी

सोलापूर, दि. 09, नोव्हेंबर - गॅसचे दर दरमहा एक तारखेस बदलत असून, त्याबाबत सविस्तर माहिती गॅस ग्राहकांना नसते. त्यामुळे ग्राहकांना गॅस दराची माहिती मिळण्यासाठी दुक ानाबाहेर फलक लावावे. गॅस देताना त्याचे वजन करून द्यावे, अशी मागणी गॅस ग्राहक संघाच्या वतीने अन्नपुरवठा अधिकारी यांच्याकडे करण्यात आले. शहरात 15 घरगुती गॅस  वितरक आहेत. त्यांच्याकडून घरपोच गॅस दिला जातो. पण गॅस पोहचवणार्‍यांकडे वजन काटा नसल्यान गॅसचे वजन किती आहे कळत नाही. गॅस बिल दिले जात नाही. पण क ायद्यानुसार ग्राहकाचे बिले दिले पाहिजे. गॅस घरपोच दिल्यावर ग्राहकांची स्वाक्षरी घ्यावे तसे होत नाही. याबाबत यापूर्वी निवेदन देऊनही पुरवठा विभागाकडून काहीच झाले नाही. या  निवेदनानुसार कारवाई करावे अशी मागणी संघाने केली.