Breaking News

ओला-सुका कचरा वर्गीकरण; 12 हजार व्यापार्‍यांना पत्र देणार

सोलापूर, दि. 09, नोव्हेंबर - स्वच्छ भारत सर्व्हेक्षण 2018 अंतर्गत ओला-सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी शहरातील 12 हजार 729 व्यापार्‍यांना महापालिका पत्र देणार आहे.  काही व्यापार्‍यांना पत्र देण्यात आले आहे. पत्रानुसार कचरा वर्गीकरण नाही केल्यास व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महापालिका उपायुक्त त्रिंबक ढें गळे-पाटील यांनी दिली. शहरातील कचरा ओला-सुका असे वर्गीकरण करण्याबाबत पालिका नियोजन करत आहे. प्रायोगीक तत्त्वावर स्मार्ट सिटी एरियात 35 घंटागाड्याच्या  सहाय्याने ओला-सुका कचरा वर्गीकरण करुन संकलन करण्यात येईल. मंगळवारपासून पत्र देण्यास सुरुवात करण्यात आली. रेल्वे, बस स्थानक परिसरातील 500 मीटर  अंतरापर्यंत ओला-सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी सक्ती करण्यात येणार आहे.