Breaking News

अनिकेत कोथळेच्या भावांनी अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी सांगलीचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधिक्षक डॉ. दीपाली काळे यांची बदली करण्यात आलीये. या प्रकरणी या दोघांची चौकशी सुरू होती. राज्याच्या गृह विभागाने गुरुवारी बदल्यांचे आदेश जारी केले. 



अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी अनिकेतच्या भावाने आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी लगेल ताब्यात घेतल्यामुळे पुढचा अनर्थ टळलाय.

दत्तात्रय शिंदे यांची नागपूरला तर दीपाली काळे यांची सोलापूरला बदली करण्यात आलीय. मात्र, अजून हवा तसा तपास झाला नाही अशी नाराजी कोथळे कुटुंबियांनी व्यक्त केलीये. सांगली शहर पोलीस स्टेशन समोरच्या चौकात अनिकेतच्या भावांनी अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केलाय.