Breaking News

सतीश कानवडे यांना राष्ट्रीय कृषीरत्न पुरस्कार प्रदान

अहमदनगर, दि. 08, नोव्हेंबर -  संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजारे उपाध्यक्ष, प्रगतशील शेतकरी तसेच किसान क्रांती संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख सतिश कानवडे यांना मानाचा  राष्ट्रीय कृषीरत्न पुरस्कार-2017 देऊन गौरवविण्यात आले आहे. 
निफाड येथे झालेल्या महराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने शानदार कार्यक्रमात त्यांना गौरविण्यात आले. सावरचोळ येथील उच्चविद्याविभूषीत व प्रगतीशील शेतकरी असलेले सतिश क ानवडे यांनी आपल्या आवडीतून शेतामध्ये मोठे वैभव उभे केले आहे. आपल्या दीड एकर शेतात सुमारे 1200 विविध दुर्मिळ वनस्पतींचे रोपन करुन जैविक विविधता साधन कृषी  पर्यटन केंद्र उभारुन शेतीत दिशादर्शक कार्य केल्याबद्दल त्यांना यापुर्वीही राय स्तरीय कृषीभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे  उपसभापती असलेले कानवडे यांनी सातत्याने शेतीमध्ये नवनवीन उपक्रम राबविले आहेत. तसेच शेतक-यांसाठी मोठे जनआंदोलन उभे केले. कानवडे परिवाराने कृषी पर्यटनासाठी  नवे दालन खुले केले असून आर्युेवेदिक वनस्पती अतिशय दुर्मिळ असून विविध जातींचे रोपन केले आहे.
यावेळी आमदार रुपनवर म्हणाले की, संगमनेर तालुका हा विचारांचा व चळवळींचा तालुका आहे. हा तालुका आवर्षणप्रवण असून येथे सातत्याने दुष्काळी परिस्थिती आहे.  आ.बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्वाखाली येथील शेतक-यांनी मोठ्या जिद्दीने विकास साधला आहे.पाण्याची बचत व काटकसर हा मंत्र सतत जोपासला आहे. कृषी क्षेत्राची आवड व  व्यापारी दृष्टीकोनाबरोबर नाविण्यपुर्ण उपक्रम यामुळे शेती व्यवसायातही मोठा आनंद निर्माण झाला आहे. सतिश कानवडे यांचे काम युवकांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे. यावेळी सत्क ाराला उत्तर देतांना सतिश कानवडे म्हणाले की, शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिल्यास युवकांना नव्या रोजगारांच्या संधी निर्माण होतील. हा पुरस्कार तालुक्यातील शेतक-यांचा असून  ह्या पुरस्काराने आणखी काम करण्याची उर्जा मिळाली असल्याचे ही ते म्हणाले. या पुरस्काराबद्दल राज्याचे माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे,  बाजीराव खेमनर पाटील, नगराध्यक्षा दुर्गा तांबे,अ‍ॅड.माधवराव कानवडे,रणजितसिंह देशमुख यांनी आभिनंदन केले आहे.