Breaking News

वैजापूर येथे वेगवेगळया घटनेत प्रसूती प्रक्रियेत दोन मृत्यू

औरंगाबाद, दि. 09, नोव्हेंबर - वैजापूर येथे दोन वेगवेगळया घटनेत एका गरोदर महिलेचा व एक दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. तालुक्यातील लासूरगाव  येथील शोभा नेटके यांना प्रसूती वेदना होत असल्याने नातेवाईकांनी लासूर स्टेशन येथील आरोग्य केंद्रात दाखल केले होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना  औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. या ठिकाणी उपचार सुरु असतानाच शोभा यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी घाटी चौकीचे एम.ए.तडवी यांनी दिलेल्या मा हितीवरून वैजापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तर दुसर्या एका घटनेत गोलवाडी शिवारातील गायरानात काजलाबाई विश्‍वनाथ भोसले या सोमवारी प्रसूत झाल्या.  त्यांनी जन्म दिलेल्या बाळाला नातेवाईकांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता ते मृत झालेले होते. मृत्यूची नोंद केली आहे.