प्रकृती बिघडल्यामुळे रेल्वेमंत्री पियूष गोयल रूग्णालयात दाखल
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक चालू असतानाच बोलताना त्यांना पोटदुखीचा प्रचंड त्रास सुरू झाला आणि त्यांना बैठक अर्ध्यावर सोडून रूग्णालयात दाखल करावे लागले. गोयल यांना बोलतानाही थोडा त्रास होत होता, त्यांचा घसा दुखत होता आणि त्यांच्या पोटात अचानक वेदना होऊ लागल्या म्हणून त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीचकँडी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.