नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था मजबूत, काळ्या पैशाला चाप - नितीन गडकरी
मुंबई, दि. 09, नोव्हेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने उचललेल्या नोटबंदी व जीएसटीच्या पावलांमुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे आणि काळ्या पैशाला चाप लागला आहे. ज्या लोकांचे काळ्या पैशाचे व्यवहार होते त्या व्यक्ती व त्यांना पाठिंबा देणारे राजकारणी यामुळे दुःखी झाले असले तरी हे निर्णय देशहिताचे असल्याने सर्वसामान्य लोक मात्र त्यावर खुष आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर रोजी हजार व पाचशे रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला होता. नोटबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षातर्फे ‘काळा पैसा विरोधी दिवस’ साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या
नोटबंदीच्या निर्णयामुळे तिजोर्यात दडविलेला पैसा लोकांना बँकांमध्ये भरावा लागला. एकूण नोटांपैकी 99 टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्यामुळे सरकारला काळा पैसा बाळगलेल्यांची माहिती शोधणे सोपे झाले आहे. 17 लाख 73 हजार अशी बँक खाती सापडली आहेत. ज्यांच्यामध्ये भरलेले पैसे हे त्यांच्या मालकांच्या आयकराच्या माहितीशी विसंगत आहेत. बँका व वित्तीय संस्थांनी 4.7 लाख खाती संशयास्पद असल्याचे कळविले आहे. या सर्व खात्यांची तपासणी चालू आहे. काळा पैसा शोधून काढणे, त्यावर कारवाई करणे आणि देशाची अर्थव्यवस्था स्वच्छ कऱण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या हजारो बनावट कंपन्या सापडल्या असून त्यांच्या बँक व्यवहारांचाही शोध लागला आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
नोटबंदीच्या निर्णयामुळे घरांच्या किंमती घसरल्या आहेत, गृहकर्जाच्या आणि शैक्षणिक कर्जाचे व्याजदर घसरले आहेत. नोटबंदीच्या निर्णयामुळे बचतीचे प्रमाण वाढले आहे. बनावट नोटा निपटून काढल्या गेल्या. दहशतवादी व नक्षलवाद्यांचा आर्थिक पुरवठा रोखला गेला. हवाला व्यवहारांना चाप बसला. डिजिटल आर्थिक व्यवहार 58 टक्के वाढले. पन्नास लाखापेक्षा जास्त कर्मचार्यांची बँक खाती उघडून त्यामध्ये पगार थेट जमा होऊ लागला, असेही ते म्हणाले.