Breaking News

कर्मचार्‍यांवरील चौथ्या, सहाव्या आयोगातील अन्याय दूर करा


सोलापूर, दि. 19, नोव्हेंबर - सोलापूर राज्यवेतन त्रुटी श्रेणी समितीची बैठक मुंबई येथे झाली. समिती प्रमुख ना. भा. रिंगणे, वि. द. शिंदे, उपसचिव, ग्रामविकास विभाग, गिरीश भालेराव, उप सचिव ग्रामविकास विभाग, दि. ग. मोरे, सेवानिवृत्त सह सचिव, ग्रामविकास विभाग, कक्ष अधिकारी. श्री. भांडारकर यांच्या समवेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (औंकार प्रणित,) जिल्हा परिषद सर्व संवर्गाचे वेतन श्रेणी त्रुटीच्या संदर्भात चौथा ते सहावा वेतन आयोगामध्ये जिल्हा परिषद कर्मचार्‍यांवर झालेल्या अन्यायाबद्दल संपूर्ण प्रस्ताव वेतनश्रेणी त्रुटी समितीस सादर केला आहे समितीने कर्मचार्‍यांना वेतन त्रुटीबद्दल सत्कारात्मक, विचार करण्यात येईल, असे आश्‍वासन जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (औंकार) यांना दिले.