संगमनेर काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी पै. तात्याराम कुटे
संगमनेर (प्रतिनिधी) काँग्रेस नेते मा. महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात व आ.डॉ. सुधीर तांबे यांचे मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी सुकेवाडी येथील पै. तात्याराम भाऊसाहेब कुटे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली.
या निवडीबद्दल आ. थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात कुठे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाबा ओहोळ, निर्मला गुंजाळ, अर्चना बालोडे, सौदामिनी कान्होरे, सुनिता कांदळकर, प्रा. नामदेव कहांडळ, निखील पापडेजा, गौरव डोंगरे आदींसह युवक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
या निवडीबद्दल आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, बाजीराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, भाऊसाहेब कुटे, भारत सातपुते, गोरख कुटे, खंडू सातपुते, वैभव सातपुते, बाजीराव कुटे यांचेसह सुकेवाडी ग्रामस्थांनी पै. तात्याराम भाऊसाहेब कुटे यांचे अभिनंदन केले आहे.