पद्मावती चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी आंदोलन
औरंगाबाद, दि. 09, नोव्हेंबर - ’पद्मावती चित्रपटावर बंदी झालीच पाहिजे’, ’एक दो एक दो भन्साळी को फेक दो’, ’भन्साळीच करायच काय खाली डोके वर पाय पदमावती चित्रपट बंद झालाच पाहिजे. निषेध निषेध भन्साळीचा निषेध’ अशा घोषणा देत शहरातील युवकांनी पंचायत समिती महाराणा प्रताप पूल ते उपविभागीय कार्याल तसेच डॉ. आंबेडकर पुतळा ते तहसील असा निषेध मोर्चा काढला पद्मावती चित्रपट प्रदर्शनाला कडाडून विरोध केला व संजय भन्साळीचा निषेध व्यक्त करण्यात आला. उपविभागीय दंडाधिकारी क ार्यालयात नायब तहसीलदार डी.डी. खाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय लांजेवार नांदेडकर व तहसीलदार दिपाली खर्डेकर यांना लेखी निवेदन देऊन या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. तालुक्यातील राजपुत परदेशी समुदायाचे युवकांसह ज्येष्ठ नागरिकही या संजय भन्साळीच्या निषेधासाठी व पद्मावती चित्रपट प्रदर्शन विरोधासाठी मोर्चात सहभागी झाले होते. राजपुत युवक क्षत्रिय संघटना संपूर्ण वैजापूरकराशी प्रामुख्याने राजपूत समाजाचे ज्येष्ठ नागरिक माणिकसिंह राजपूत, गंगारामसिंह राजपूत, जीवन राजपूत, भगवानसिंह राजपूत, धोंडिरामसिंह राजपूत, मर्चंट बँक चेअरमन विशाल संचेती, मराठा स्वराज्य ग्रुप पारस घाटे, भाजपा युवा मोर्चाचे महेश भालेराव, गोरख दौडे, महाराणा युवक संघटना समक्ष राजपूत समाज व हिंदू समाज, योगेश राजपूत, संजय राजपूते, सचिन राजपुत, गोकुळसिंह राजपूत, भगतसिंह राजपूत, सम्राट राजपूत, संतोष राजपूत, दिनेश राजपूत, राजुसिंह राजपूत, प्रेम राजपूत, मंगल राजपूत, डॉ. योगेश राजपूत, डॉ. दिनेश राजपूत, डॉ. सचिन राजपूत, निलू राजपूत, सोनु राजपूत, सागर राजपूत, मुके श राजपूत, विजयसिंह राजपूत, पवन राजपूत, सम्राट राजपूत आदी मोठ्या संख्येनेत उपस्थित होते.
