नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात ऊस आंदोलकांवर गोळीबार
अहमदनगर, दि. 16, नोव्हेंबर - शेतक-यांच्या ऊसाला यंदाच्या वर्षी 3 हजार रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी शेतक-यांनी बुधवारी शेवगाव तालुक्यात पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. रस्त्यावर उतरून जाळपोळ करणा-या शेतक-यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सुरूवातीला अश्रूधूराचा वापर केला. तरी देखील आंदोलक आक्रमक असल्याने पोलिसांनी अखेर गोळीबार केला. या गोळीबारात 3 शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती खूपच गंभीर असल्याचे समजते.
स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीच्या वतीने सोमवार सकाळपासूनच शेवगाव तालुक्यातचील घोटण येथे रस्ता रोको आंदोलन सुरू केले होते. सरकारने ऊस दराच्या प्रश्नात लक्ष घालावे,शेतक-यांच्या ऊसाला प्रतिटन 3 हजार 100 रूपये इतका भाव मिळावा या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीच्या वतीने सोमवार सकाळपासूनच शेवगाव तालुक्यातचील घोटण येथे रस्ता रोको आंदोलन सुरू केले होते. सरकारने ऊस दराच्या प्रश्नात लक्ष घालावे,शेतक-यांच्या ऊसाला प्रतिटन 3 हजार 100 रूपये इतका भाव मिळावा या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते.
आंदोलक शेतक-यांनी बुधवारी सकाळी ऊसाने भरलेली वाहने अडविण्यास सुरूवात केली. शेतकरी संघटनेचे नेते दादासाहेब टाकळकर, संदीप मोटकर, शुभम सोनावळे, दत्तात्रय फुंदे, संतोष गायकवाड, बाळासाहेब फटांगरे आदी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी आणखीनच उग्र रूप दारण केले.
शेतक-यांनी पैठण-शेवगाव रस्त्यावर घोटण, खानापूर, कर्हेटाकळी, एरंडगाव, कुडगाव आदी ठिकाणी रस्त्यावर टायर तसेच लाकडे जाळली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी प्रथम लाठीमार केला. त्यानंतर अश्रूधुराची नळकांडी फोडण्यात आली. तरीदेखील आंदोलक शांत होत नसल्याने पोलिसांनी अखेरीस गोळीबार केला. यामध्ये 3 शेतकरी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी लाठीमार, अश्रूधुर व गोळीबार सुरू करताच आंदोलकांमध्ये पळापळ झाली.प रिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य राखीव दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले असून सध्या संपूर्ण तालुक्यात तणावपूर्ण शांतता आहे.