पारदर्शकतेमुळे न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता- न्या. व्ही.पी. गायकवाड
नागपूर, दि. 10, नोव्हेबर - पारदर्शक व्यवस्थेमुळेच नागरिकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे प्रतिपादन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश व्ही.पी. गायकवाड यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाद्वारे राष्ट्रीय विधी सेवा सप्ताहाच्या सुभारंभप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव कुणाल जाधव, सदस्य अॅड्.पी.के. सत्यनाथन, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड्. प्रकाश जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी न्या. गायकवाड म्हणाले की, गरजूंना कायदेविषयक मदत करण्यासाठी न्याय विधी सेवा प्राधिकरणव्दारे प्रयत्न करण्यात येत आहेत. राष्ट्रीय विधी सेवा दिवस सप्ताहाच्या माध्यमातून कायदेविषयक मार्गदर्शन करणे या हेतूसह न्याय व्यवस्थेविषयीचा विश्वास आणखी वृद्धिंगत करण्यासाठी आयोजन असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा विधी सेवा प्राधिक रणाव्दारे मध्यस्थीच्या माध्यमातून अनेक प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होत आहे. यासाठी गरजूंना मोफतपणे कायदेविषयक आवश्यक मदत करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून समाजातील नागरिकांना विधिप्रक्रियेबाबत माहिती देवून त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारा आयोजित या सप्ताहाच्या निमित्ताने विविध उपक्रंमांच्या माध्यमातून करण्यात येत असलेले कार्य प्रशंसनीय असल्याचे ते म्हणाले.