‘पद्मावती’ सिनेमावर बंदीची मागणी पैठणला राजपूत समाजाचा मोर्चा
‘महाराणी पद्मावती’ या चित्रपटावर कायमची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करीत पैठणच्या राजपूत समाजाने भव्य मोर्चा काढला. प्रचंड घोषणाबाजीत निघालेल्या या मोर्च्यात राजपूत समाजातील महिला संख्या लक्षणीय होती. ‘महाराणा प्रताप की जय’ व ‘महाराणी पद्मावती जिंदाबाद’चे नारे देत निघालेल्या या राजपूत बांधवांना पैठणमध्ये सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला.
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला प्रारंभ झाला. यावेळी शिवसेना, ब्राह्मण सभेचे पदाधिकारी तथा शिवसेना शहरप्रमुख प्रकाश वानोळे, माजी ऊपनगराध्यक्ष दिलीप पोहेकर, बजरंग दल, छावा संघटना, मराठा संघटना, राजमुद्रा प्रतिष्ठान, गुजराती समाज, तेली समाज संघटनेचे आबा बरकसे, आर. पी. आय., राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे जालिंदर अडसूळ, कपिल पहेलवान, भाजप शहराध्यक्ष विजय चाटुपळे, उपनगराध्यक्षा सुचित्रा जोशी यांनी मोर्चात सहभागी होऊन पाठिंबा दिला.
यावेळी परदेशीपूरा येथील महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पुजन करून हा मोर्चा मुख्य बाजारपेठ मार्गाने बसस्थानक चौकात पोहचला. तेथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून तहसील कार्यालयात धडकला. नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. ‘महाराणी पद्मावतींच्या गौरवशाली इतिहासाची मोडतोड खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित करू नये’ अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. ‘मेवाडची महाराणी पद्मीनी यांची पराक्रमी जीवनगाथा ही भारताची अस्मिता आहे. त्यामुळे या चित्रपटाला आमचा तीव्र विरोध आहे, अशा आशयाचे ‘पैठण राजपूत पंच कमिटी’च्यावतीने निवेदन देण्यात आले आहे.
मोर्चाच्या यशस्वीतेसाठी राजपूत समाज अध्यक्ष सोमनाथ परदेशी, उपाध्यक्ष किशोर चौहान, प्रकाश लक्कडहार, सोमनाथ नगरकर, एकनाथ पटेल ( करडवाल ), पत्रकार बद्रीनाथ खंडागळे, शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सोमनाथ टाक, परसराम पटेल, केदार खंडागळे, अमर चौहान, महिला राजपूत पदाधिकारी अहिल्या करकोटक, देवका परदेशी, ललिता परदेशी व परदेशीपूरा प्रभागाच्या नगरसेविका अलका गोपालसींग परदेशी यांनी यासाठी पुढाकार घेतला. तर गणेश खंडागळे, गणेश बुंदेले, विशाल भोपत, केदार मिरदे, दिनेश चौहान, कपिल खंडागळे, सिध्दार्थ शंकरे, नितेश टाक, यश राजपुत, अमर टाक, गुरुदत्त करकोटक, कुणाल चौके आदींनी पुढाकार घेतला.