सोलापूर रेल्वे स्थानकाला बसवेश्वरांचे नाव देण्याचा प्रस्ताव सादर करणार
सोलापूर, दि. 09, नोव्हेंबर - सोलापूर विद्यापीठाच्या नामकरणावरून अस्वस्थ झालेल्या सिद्धेश्वरभक्तांना दिलासा देण्यासाठी सोलापूर रेल्वेस्थानकाचे महात्मा बसवेश्वर रेल्वे स्थानक असे नामकरण करण्याचा प्रस्ताव आठ दिवसांत रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. लिंगायत समाजातील पोटजातींना ओबीसी आरक्षणासाठी आठवडाभरात बैठक घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.
सोलापूर विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केल्यानंतर सोलापूर परिसरातील सिद्धेश्वर भक्तांमध्ये पसरलेल्या अस्वस्थतेची माहिती पालकमंत्रीदेशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून सांगितली. मुंबईतील श्री छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर महात्मा बसवेश्वर किंवा सिद्धेश्वर महाराज यांचे नाव देण्यासाठी जिल्हा धिकारी कार्यालयाकडून प्रस्ताव मागवला जाईल. दरम्यान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी संवाद साधून प्राथमिक मान्यताही घेतली आहे, असे देशमुख यांनी सांगितले. बसवेश्वर स्मारकाचा प्रश्न मार्गी मंगळवेढा तालुका बीजगुणन प्रक्षेत्र येथील कृषी विभागाच्या जमिनीवर बीजगुणन, रोपवाटिका, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीसह कृषी पर्यटनाचे मॉडेल विकसित केले जाईल. त्यास श्री महात्मा बसवेश्वर स्मारक असे नाव असेल. याबाबत जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडून सात दिवसांत रीतसर प्रस्ताव मागवला जाणार आहे, असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. अधिवेशनापूर्वी घोषणा सोलापूर रेल्वे स्थानकास महात्मा बसवेश्वरांचे नाव देण्याची घोषणा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी करण्याबाबत प्रयत्न करू. मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी ते मान्य केले, असे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.