सात-बारा दुरुस्ती अपूर्ण, 11 तहसीलदारांना नोटिसा
सोलापूर, दि. 09, नोव्हेंबर - राज्य शासनाने सात-बारा उतारे दुरुस्त करण्यासाठी सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मुदतीत फक्त 477 गावांच्या उतार्यांमध्ये पूर्ण दुरुस्ती क रण्यात आली. उर्वरित गावांच्या उतार्यांमध्ये दुरुस्ती केल्याने तहसीलदार यांना जबाबदार धरून नोटिसा बजावल्या आहेत. मुदतीत काम पूर्ण केल्याने नोटिसा दिल्या असून, यावर म्हणणे मांडण्याचे आदेशही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.
ऑगस्ट 2015 पासून जिल्ह्यात ऑनलाइन सात-बारा देण्याच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली. गेली दोन वर्षे यातील त्रुटी दूर करून अचूक उतारा देण्यासाठी शासनाने वारंवार मुदतवाढ दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जुलैमध्ये प्रत्येक गावात चावडीवाचन करून यावर हरकती मागवल्या. या हरकतीनुसार सप्टेंबर अखेरपर्यंत अचूक उतारे देण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले. ऑक्टोबर अखेरपर्यंत प्रत्यक्षात 1139 पैकी 477 गावांमध्येच अचूक उतारे देता आले. यामुळे जिल्हाधिकारी भोसले यांनी मुदतीत उतार्यामध्ये दुरुस्ती केल्याने जिल्हाधिकार्यांनी तहसीलदारांना जबाबदार धरून नोटिसा दिल्या आहेत. ऑक्टोबरअखेर 100 टक्के उतारे दुरुस्त झालेल्या गावांची संख्या पाहता मुदतीत उतारे दुरुस्त होणे शक्य नाही. या संबंधित यंत्रणेकडून मुदतीत काम झाल्यामुळे आपणास जबाबदार धरून कारवाई का करण्यात येऊ नये? याचाही खुलासा करावा, असे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.ऑक्टोबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील 1139 पैकी 477 गावांमध्ये अचूक उतारे देण्यात येत आहेत. 537 गावांमध्ये उतारे दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर 949 गावातील प्रोसेसिंगची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 190 गावांमध्ये अद्याप ही प्रक्रिया सुरू होणे बाकी आहे. मोहोळ तालुक्यातील सर्वाधिक 104 पैकी 94 गावांमध्ये अचूक उतारे देण्याचे काम सुरू आहे.
अचूक उतारे मिळणारी गावे अक्कलकोट 27, उत्तर सोलापूर 19, करमाळा 66, दक्षिण सोलापूर 29, पंढरपूर 17, बार्शी 30, माढा 60, माळशिरस 40, मोहोळ 94, मंगळवेढा 34, सांगोला 61.