अल्पभूधारक व भूमिहीन शेतमजुरांना चांगले उत्पन्नाचे साधन
महिलांचा शेतकर्यांना आर्थिक स्तर उंचावला पाहिजे. व्यवसाय निवडताना त्याचा पूर्ण अभ्यास करावा. कोणत्याही व्यवसायात अपयश कधीच येत नाही. जेव्हा तो व्यवसाय सोडून देतो, तेव्हाच अपयश येतं. शासनाच्या माध्यमातून शेतकरी उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करीत आहे.
कडकनाथ कुक्कुटपालनच्या माध्यमातून अल्पभूधारक व भूमिहीन शेतमजूर यांना एक चांगले उत्पन्नाचे साधन आहे, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथील पशुविज्ञान विशेषज्ज्ञ डॉ. सोमनाथ भास्कर यांनी केले.
आत्माच्या माध्यमातून आयोजित कडकनाथ कुक्कुटपालन शेतकरी प्रशिक्षण वर्गाप्रसंगी कृषी विज्ञान केंद्र दहिगाव-नेचे पशुविज्ञान विशेषज्ज्ञ डॉ. सोमनाथ भास्कर बोलत होते. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बर्हाटे, सरपंच रोहिणी गागरे, आत्मा समितीचे अध्यक्ष राहुल झावरे, डॉ. राजू गंधे, देवेंद्र जाधव आदी उपस्थित होते.
