अहमदनगर ः शहरातील मंदिरावर कारवाई झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा मंदिर बांधून देईल, अशी घोषणा केली होती. मनसेला दिलेला शब्द पाळला, असे सांगत नगर-कल्याण रोडवरील लक्ष्मीमाता मंदिर पुन्हा बांधण्यास मनसेने सुरूवात केली. महापालिकेने पहिल्या कारवाईत हे मंदिर पाडले होते. हा मंदिराचा पाय तसाच होता. त्याच पायावर मनसेने मंदिर उभारण्यास सुरूवात केली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, गिरीष जाधव, परेश पुरोहित, अशोक दातरंगे, नीलेश खांडरे, मनोग राऊत, गणेश लालबागे, अमोल हजारे, संजय शेळके, राम लोंढे आदी उपस्थित होते.