Breaking News

सातारा शहरात कायद्याविषयक जनजागृतीनिमित्त रॅली

सातारा, दि. 10 (प्रतिनिधी) : जिल्हा विधी प्राधिकरणाच्या वतीने दि. 9 ते 18 नोव्हेंबरपर्यंत शहरात कायद्याच्या जनजागृतीसाठी विविध कार्यकमाचे आयोजन करण्यात येणार आहे.  त्या अनुषंगाने जिल्हा न्यायालय येथून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीला प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश आर. एन. लढ्ढा यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले.
यावेळी  विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. वर्षा पारगांवकर, जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, वकील, कर्मचारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अशी ही रचना असून सर्वसामान्यांना कायद्याविषयी  जनजागृती व्हावी, यासाठी रॅलीचे  आयोजन करण्यात आले होते. रॅली जिल्हा न्यायालय येथून पोवई नाका, एसटी स्टॅन्ड ते जिल्हा न्यायालय अशी काढण्यात आली. रॅलीनंतर जिल्हा न्यालयात सुरु केलेल्या विधी  सेवा मदत केंद्राचे उद्घाटन प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश आर. एन. लढ्ढा यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा विधी प्राधिकरणाच्या वतीने विधी स्वयंसेवकांकडून शहरातील  आणि जिल्ह्यातील अधिकाधिक लोकांपर्यंत जावून कायद्याची जागृती करण्यात येणार आहे.