Breaking News

प्रवरा ‘अभियांत्रिकी’च्या विद्यार्थ्यांची टीएएफएएन स्पर्धेत निवड

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कृषी विद्यापीठ आणि जॉनडियर या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या टीएएफएएन या स्पर्धेमध्ये लोणी येथील प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संघाची विशेष गुणांसह निवड झाली आह. हे विद्यार्थी आता कांदा हार्वेस्टिंग मशिन तयार करणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. यशवंत खर्डे यांनी दिली.

भारतातील कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सेई या आंतरराष्ट्रीय नामांकित संघटने मार्फत पुढाकार घेण्यात आला असून याचाच एक भाग म्हणून राहुरी येथे टीएएफएएन या स्पर्धेअंतर्गत वर्च्युअल राऊंड्स आयोजित करण्यात आले होते. यात राज्यातील विविध २७ नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांनी कांद्याच्या साठवणीसाठी त्यांच्या मशीनचे आभासी डिझाइन सादर केले. या पैकी १७ संघ दुसऱ्या फेरीसाठी निवडले गेले आहेत. यात लोणी येथील प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संघाची विशेष गुणांसह निवड झाली हे विद्यार्थी आता कांदा हार्वेस्टिंग मशिन तयार करणार असून यासाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.यासाठी राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी आर्थिक मदत केली आहे. पंजाबमधील चित्कारा विद्यापीठामध्ये गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या सेई -बाजा या स्पर्धेमध्येही प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संघाची विशेष गुणांसह निवड झाली होती. विद्यार्थ्यांना प्रोस्थाहन मिळावे, यासाठी अशाअश्या प्रकारच्या संशोधनासाठी सातत्याने मदत करण्याची ग्वाही विखे यांनी दिली असल्याचे फॅकल्टी अडवाईझर प्रा. पद्माकर काडबूके आणि प्रा. निलेश मनकर यांनी सांगितले.

या विद्यार्थ्यांत भूषण खांदे (कॅप्टन), सरवन कुमार (उपकॅप्टन), पंकज हगर, राहुल वारके, संकेत विसपुते, जिशान शेख, रोहित कुलांगे, दीपक फोके, अक्षय गोसावी, राहूल वाजे, राहुल मगर, प्रियांका धगे, सुहास गुरव, सचिन कांदे, अभिषेख गांगुर्डे, धीरज गिरासे, स्वप्नील दिघे, धीरज निर्मल, मयूर दिघे, हर्षल वानखेडे, श्रीकांत लांडे, योगेश नागरे, रोहित जोशी, प्रतिभा काळे, आदित्य कुलक, यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

या विद्यार्थ्यांचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे, ज़िल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील, डॉ. सुजय विखे, सहसचिव भारत घोगरे, संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, प्रवरा इंजिनीरिंगचे प्राचार्य. डॉ. यशवंत खर्डे, शिक्षणाधिकारी (तांत्रिक) प्रा. शरद रोकडे, मेकॅनिकल इंजिनिअरींगचे विभागप्रमुख प्रा. आर. आर. खर्डे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले आहे.