Breaking News

दोन लाखांच्या विदेशी सिगारेट जप्त


औरंगाबाद, दि. 24, नोव्हेंबर - कर्करोगासंबधी वैधानिक इशारा नसलेल्या विदेशी बनावटीच्या दोन लाख रुपयांच्या सिगारेट पोलिसांनी जप्त केल्या. सिटीचौक व मिलकॉर्नर भागातील दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जमील मुजीब यारखान (वय 27,रा. मिलकॉर्नर) व सय्यद आदीब सय्यद नजीर (कोतवालपुर) अशी विक्रेत्यांची नावे आहेत. 

हे दोन्ही व्यापारी वैधानिक इशा-याचे चित्र, किंमत नसलेल्या विदेशी सिगारेटची विक्री करीत होते. शहरातील अशा बेकायदेशीर विक्री व्यवहाराला पायबंद बसविण्याच्या दृष्टीने पोलिसांनी ही धडक कारवाई केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.