Breaking News

जळगावातील विविध समस्यांचे भाजपतर्फे मनपा आयुक्तांना निवेदन

जळगाव, दि. 08, नोव्हेंबर - जळगाव भाजप जिल्हा महानगरातर्फे आज सकाळी 11.30 वाजता जळगाव शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त यांना जळगाव शहरातील विविध  समस्यांबाबतचे निवेदन जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे व भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आदींच्या उपस्थितीत देण्यात येऊन प्रश्‍न सोडविण्याचे आवाहन करण्यात  आले.
भाजपाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शहरात डासांचे साम्राज्य वाढले असून त्यामुळे डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, टायफॉईड या प्रकारची रोगराई पसरत आहेत. खुल्या भूखंडात  उगवलेले गवत आणि कचरा उचलला जात नसल्याने हा प्रकार होत आहे. म.न.पा.कडून काही भागात दुषित पाणी पुरवठा होत आहे. अनेक भागात रस्त्यांत खड्डे पडले असून पथ दिवे दुरुस्तीसाठी वाहने उपल्बध नाहीत. गटारी व सार्वजनिक शौचालय यांची स्वच्छता व दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने दुर्गंधीयुक्त वातावरण तयार झाले आहे . गटारींची स्वछता  होणे आवश्यक असून या उपाय योजना करण्यात याव्यात, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.