जिल्हयात शस्त्र व जमावबंदीचे आदेश
मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अवये हे आदेश करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सध्याचे तणावात्मक वातावरण पाहता कायदा आणि सुव्यवस्थचा प्रश्न उद्भवून शांतता भंग होऊ नये यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.
ही कृत्ये करण्यास मनाई
अ) शस्त्रे, काठया, सोटे, तलवारी, भाले, सुरे बंदुका, दंडे अगर लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर बाळगणे. ब) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे व साधने जवळ बाळगणे किंवा तयार करणे क ) कोणत्याही व्यक्तीच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे. ड) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे. इ) जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे , वादय वाजविणे. ई) सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणने अगर तशी चित्रे, चिन्ह किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्याचा प्रचार करणे. फ) सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचाराचे तसेच अन्य कारणास्तव सभा घेणेस , मिरवणुका काढण्यास व पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात येत आहे.
सदर आदेश खालील व्यक्तीना लागु होणार नाहीत.
अ) शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पुर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे. ब) प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणूका, लग्नसमारंभ, लग्नाच्या मिरवणूका हे कार्यक्रम. क) सभा घेण्यास अगर मिरवणूका काढण्यास ज्यांनी संबंधीत तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांची रितसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्ती
