कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून विवाहितेवर सामुहिक बलात्कार
औरंगाबाद, दि. 05, नोव्हेंबर - वाढदिवसाच्या पार्टीत एका विवाहितेला कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून चार जणांनी तिच्यावर बलात्कार करून बेशुध्द अवस्थेत असताना तिला रात्री पेट्रोल पंपासमोर आणून टाकल्याची घटना घडली. या प्रकरणी तिच्या एका मित्रास पोलिसांनी अटक केली आहे.
मुकुंदवाडी परिसरातील संतोषी मातानगर येथील एका बावीस वर्षाच्या विवाहित स्त्रीला तिच्या मित्राने त्याच्या वाढदिवसासाठी संध्याकाळी आपल्या दुचाकीवरून जालना रोडमार्गे शेंद्रा एमआयडीसीजवळील टाकळी शिवारात नेले तेथे त्याचे तीन मित्र जेवणाचे पार्सल आणि दारूच्या बाटल्या , कोल्ड ड्रिंक घेवून आले.तेथे मोकळया राणात तिला कोल्ड्रींकमधून दारू पाजवली आणि जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. बेशुध्द अवस्थेत असताना तिला आरोपींनी बाईकवरुन चिकलठाणा विमातनळासमोरील एका पेट्रोलपंपाजवळ आणून टाकले. पंपावरील लोकांनी या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दुरध्वनीव्दारे कळविली. त्यानंतर पोलिसांनी तिला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असताना तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले.यातील एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाकीच्या तिघांचा शोध सुरू आहे.