‘स्वातंत्र्यसंग्राम’ स्मारकाचे लोकार्पण सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते
औरंगाबाद, दि. 05, नोव्हेंबर - क्रांतीचौक येथील भव्य अशा ध्वजस्तंभ तथा ‘स्वातंत्र्यसंग्राम’ स्मारकाचे लोकार्पण आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. हैद्राबाद मुक्तीसंग्रामाच्या आंदोलनात रजाकरांनी सामान्य जनेतवर केलेल्या अत्याचाराचा उल्लेख या वेळी राज्यपालांनी केला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता हा लढा दिला म्हणून भारतात हैद्राबाद संस्थानाचे विलीनीकरण झाले अन्यथा भारताच्या मॅप मध्ये गॅप राहिला असता. आपल्या पुर्वजांच्या बलिदानाची आठवण हा 201 फुट उंचीचा झेंडा देत राहिल, असे राज्यपाल या वेळी म्हणाले.
या ध्वजस्तंभासाठी अडीच कोटी रुपये लोकसहभागातून उभारण्यात आले आहेत. 18 शाळांमधील विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 50 रुपयांचा निधी गोळा करण्यात आला आहे .दिमाखात फडकणा-या या ध्वजस्तंभाची आणि परिसराची स्वच्छता आणि पावित्र्य जोपासण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांवर असुन आजपासुन ते सर्वांसाठी खुले असल्याचे जाहिर करण्यात आले. एप्रिल 2016 मध्ये तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट यांनी ध्वजस्तंभासंदर्भात शहरातील अधिका-यांनी बैठक घेऊन निर्देश दिले होते. त्यानंतर जागेचा शोध घेऊन क्रांतीचौकातील जागा समितीने निश्चित केली. ध्वजस्तंभ समितीचे राम भोगले, मानसिंह पवार यांनी पुढाकार घेवुन ध्वजस्तंभाचे काम पूर्ण केले.