मोक्का गुन्ह्यातील आरोपींना ५ लाखांचा दंड आणि पाच वर्षे शिक्षा
महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) आरोपींना ५ लाख रुपयांच्या दंडासह ५ वर्षे कारावासाची शिक्षा आणि दंड न भरल्यास २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. नाशिक न्यायालयाने हा आदेश दिला आहे. शिर्डी पोलिस ठाण्यात आरोपींवर याप्रकरणी गुन्हा दाखल होता.
शिर्डीचे तत्कालिन पो. नि. प्रमोद वाघ (सध्या नेमणूक राहुरी पो.स्टे.) यांनी मोक्काअंतर्गत गुन्ह्याचा प्रस्ताव दाखल केला होता. तर तत्कालीन उपनिरिक्षक लक्ष्मण भोसले (सध्या नेमणूक राहुरी पो. स्टे.) यांनी प्राथमिक तपास केला होता. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी विभागीय पो. उपअधिक्षक विवेक पाटील यांनी करुन दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ 3 {१} {११}, ३, ४ प्रमाणे मधील आरोपी नारायण नामदेव वायकर, राहुल संजय शिंगाडे दोघेही {रा. सोनेवाडी ता. कोपरगाव}, सुनिल शिवाजी थोरात {रा. डो-हाळे ता. राहाता} आदींना ही शिक्षा सुनावण्यात आली. या संपूर्ण गुन्ह्याच्या तपासात पो. ना. राजेंद्र औटी, पो. कॉ. सोमनाथ कुंढारे यांनी मदत केली.
