घुलेवाडीतील रस्त्यांच्या कामांना मिळाला मुहूर्त ! दै. लोकमंथनच्या पाठपुराव्याला यश
घुलेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील साईश्रद्धा चौक ते एकटा चौक तसेच साईश्रद्धा चौक ते १३२ के. व्ही.पर्यंतच्या रस्त्यावरून पायी चालणेही खूप अवघड झाले होते. या रस्त्यांवरून जा करत असलेल्या वाहनांचे विविध भाग खराब होण्याबरोबरच वाहनचालकांची हाडेदेखील खिळखिळी होण्याचे प्रकार नित्याचेच झाले होते.
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम विभागांना दोन आठवड्यात पूर्ण करता येणाऱ्या या कामासाठी कंत्राटदाराला सहा महिन्यांचा कालावधी देत ऑगस्ट महिन्यात कामाला सुरुवात करण्याचे आदेश असतानादेखील गेली चार महिने कामास सुरुवात झालेली नव्हती.
लोकमंथनने बातमीतून कामाच्या दिरंगाईवर टीका केल्याने आणि नागरिकांमध्ये पसरलेला असंतोष ध्यानात घेऊन प्रशासनाला जाग आली. परिणामी कंत्राटदाराला त्वरित काम सुरु करण्याचे आदेश देत प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला आज {दि. १५} सुरुवात झाली.
