Breaking News

पाकच्या तीन नागरिकांना उपचारासाठी व्हिसा मिळणार

नवी दिल्ली : एका नऊ वर्षीय चिमुकलीसह एकूण तीन पाकिस्तानी नागरिकांना भारतात वैद्यकीय उपचार घेण्यासाठी व्हिसा देण्याची घोषणा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी केली आहे. याचवेळी व्हिसा देण्यामागे राजकारण होत असल्याच्या पाकच्या आरोपाचे खंडन झाले आहे. 



पाकिस्तानी नागरिक दानिश मेमन यांनी आपली कन्या मारियाला भारतात उपचार घेण्यासाठी व्हिसा देण्याचा आग्रह केला होता. ही बालिका थॅलिसिमिया आजाराने पीडित आहे. सुषमा स्वराज यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून पीडितांना व्हिसा दस्तावेज जारी करण्याचे आदेश इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तांना दिले आहेत. 

ट्विटरवरून त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. याशिवाय मारिया आसिमने आपल्या पित्यासाठी व्हिसा मागितला होता. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. कृपया अत्यावश्यक दस्तावेजांसह पाकमधील भारतीय उच्चायुक्तालयाशी संपर्क साधावा. तेथे तुम्हाला व्हिसा प्राप्त होईल, असे आवाहन सुषमा स्वराज यांनी केले आहे.