अनिकेत कोथळे खून : स्वाभिमानी शेतकरी संघटना, दलित महासंघाचे आंदोलन
सांगली, दि. 11, नोव्हेंबर - अनिकेत कोथळे याच्या हत्येप्रकरणी जबाबदार असणा-या सांगली शहर पोलिस ठाण्याकडील सर्वच दोषी अधिकारी- कर्मचा-यांची सखोल चौकशी करावी व या सर्वांना कडक शिक्षा करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व दलित महासंघाच्यावतीने शुक्रवारी शहर पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले, तर दलित महासंघाने गाढव मोर्चा काढला.
पोलिस कोठडीत असलेल्या अनिकेत कोथळे याच्या खूनप्रकरणी युवराज कामटे, अनिल लाड, अरूण टोणे, नसरूद्दीन मुल्ला, राहूल शिंगटे व झाकीर पट्टेवाले या सहाजणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेबाबत सर्वच समाज घटकात तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. आज चौथ्या दिवशीही शहर पोलिस ठाण्यासमोर दिवसभर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध करीत युवराज कामटे याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शहर पोलिस ठाण्यासमोर दहन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते महेश खराडे व उमेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यात पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यावेळी शहर पोलिस ठाण्याच्या या हुकुमशाहीविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. दलित महासंघाच्यावतीने सांगली जिल्हा अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिस ठाण्यावर गाढव मोर्चा काढण्यात आला. संतप्त आंदोलकांनी युवराज कामटे याच्यासह सर्वच आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली.