रत्नागिरीत काँग्रेसचा काळा दिन
रत्नागिरी, दि. 09, नोव्हेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशात जारी केलेल्या नोटाबंदीच्या निषेधार्थ रत्नागिरी जिल्हा काँग्रेसने आज काळा दिन साजरा के ला. रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्त आहे. जिल्हा काँग्रेसचे प्रभारी विश्वनाथ पाटील, ड. अश्विनी आगाशे आदींसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात निदर्शने केली. भाजप सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. देशात भाजप सरकारच्या काळात महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले. सरकारने जनताविरोधी अनेक निर्णयही घेतले. त्याचा त्रास सारी जनता भोगत आहे. त्यासाठी आज ‘काळा दिन’ साजरा केल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.
काँग्रेसचे जिल्हा प्रभारी विश्वनाथ पाटील येत्या 11 ते 14 नोव्हेंबर दरम्यान जिल्हा दौरा करणार असून हुस्नबानू खलिफे, खासदार हुसेन दलवाई यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी दौर्यात सहभागी होणार असून शासनाचा निषेध करणार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.