Breaking News

नोटबंदीचे वर्षश्राध्द; काँग्रेसकडून सरकारचा निषेध

पुणे, दि. 09, नोव्हेंबर - मोदी सरकारच्या नोटबंदीच्या वर्षपूर्तीच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली एस. पी. महाविद्यालय ते कै.  वसंतदादा पाटील पुतळ्यापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरूवात नोटबंदीवर आधारित एका पथनाट्य सादरीकरणाने झाली. मोर्चामध्ये कार्यकर्त्यांनी मोदी सरक ारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. फलकावर नोटबंदीमुळे जनता त्रस्त सरकार मस्त, नोटबंदीमुळे देश भोगत आहे अश्याप्रकारचे फलके दाखवत होते. मोर्चा कै. वसंतदादा  पाटील पुतळा येथे आल्यावर नोटबंदीचे वर्षश्राध्द घालण्यात आले. 
रमेश बागवे म्हणाले की, नोटबंदी हा एक आर्थिक भूकंप आहे. या निर्णयानंतर देशात सगळीकडे हाहाकार माजला. दुसर्‍या दिवशी पासून बँकांमध्ये पाचशे, हजारच्या नोटा बदली क रण्यासाठी नागरिकांची रांग लागली. गृहिणी नेहमी आपल्या कुटूंबियांच्या भविष्यासाठी घरच्या कपाटामध्ये पैसे जमा करून ठेवतात. या निर्णयामुळे त्यांनासुध्दा आपले दैनंदिन क ामकाज सोडून बँकेच्या रांगेत उभे रहावे लागले. ज्या कुटूंबामध्ये लग्न समारंभ होते, जे रूग्ण दवाखान्यात दाखल झाले होते त्यांची सुध्दा या निर्णयामुळे गैरसोय झाली. प्रत्येक नाग रिकाला या नोटबंदीमुळे नाहक त्रास झाला आहे.