Breaking News

नगर-पुणे रोडवरील अपघातात युवक ठार

शिल्पा गार्डनजवळ सोमवारी (दि. २७) झालेल्या अपघातात नालेगावचा युवक ठार झाला. राजु किसन वाघ (वय ३६, रा. टांगेगल्ली, अ.नगर) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी भादंविकच्या १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 


याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, राजु वाघ हे त्यांच्या मोटारसायकलहून कायनेटीक चौकाकडून नगर शहराकडे येत असताना एका अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटार सायकलला जोराची धडक दिली. ही घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेत राजु वाघ हे गंभीररित्या जखमी झाले. औषधोपचाराकरीता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते मृत्यूमुखी पावले.