Breaking News

फक्त १ लिटर दुधाची किंमत ८४ हजार

वाढती महागाई ही जगभरातील मोठी समस्या बनली आहे. अनेक वेळा आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही यावर परिणाम होत असतो. व्हेनेझुएलात तर महागाईने कळस गाठला आहे. तेथील महागाईचा दर तब्बल ४००० टक्क्यांनी वाढला असल्याने लोकांना जगणे कठीण झाले आहे. 


कारण तेथे फक्त एक लिटर दुधासाठी तेथील लोक तब्बल ८४ हजार रुपये मोजत आहेत. तसेच एक डझन अंड्यांची किंमत बारा हजार रुपये झाली आहे! एका डॉलरची किंमत ८४००० बॉलीवर झाली असल्याने लोकांचे दैनंदिन व्यवहार अवघड झाले आहेत. याठिकाणी असणा‍ऱ्या बॉलीवर या चलनाचे जागतिक बाजारातील मूल्य अतिशय कमी झाल्याने दुधासारख्या पदार्थाच्या किमतीत वाढ झाली असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. 

रशिया, चीन आणि जपान देशांचे कर्ज या देशावर असल्याने देशांतर्गत व्यवहारही मोठ्या प्रमाणात थंडावले आहेत. याचा फटका रोजच्या जीवनातही लोकांना बसत आहे. महागाई बेसुमार वाढल्याने लोकांचे प्रचंड हाल होत असून दोन वेळेच्या खाण्याचीही त्यांना भ्रांत पडली आहे..