अहमदनगर कॉलेज मध्ये एनसीसी.दिना निमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न .
अहमदनगर कॉलेजमध्ये दरवर्षी एनसीसी.दिनी रक्तदान शिबिर घेण्यात येते.यावर्षी अहमदनगर कॉलेज१७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी विभाग, अहमदनगर महानगर पालिका रक्तपेढी व आनंदऋषी ब्लडबेंक यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराचा शुभारंभ कॉलेजचे व्हा. प्रिन्सिपल डॉ. कमलाकर भट,प्रा. गायकर ,रजिस्टर ए.वाय.बळीद यांच्या हस्ते डॉ. भा.पा. हिवाळे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आला.
यावेळी एनसीसी विभाग प्रमुख प्रा.एम.एस.जाधव,१७ महाराष्ट्र बटालियन पी.आयी स्टाफ दिगंबर सिंह,वीरेंद्र सिंह, अहमदनगर महानगर पालिका रक्तपेढीच्या डॉ.रुपाली कुलकर्णी,आनंदऋषी ब्लडबेंकेचे सुनील महानोर उपस्थित होते.
एनसीसी विभागातर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. स्वच्छता अभियान,वृक्षारोपण, ग्रामविकास, जनजागृती सायकल रेली अशा उपक्रमातून त्यांना सामाजिक जाणीव व देश कर्तव्याची जाणीव करून दिली जाते. देशातील रक्ताची वाढती गरज पाहता दरवर्षी एनसीसी दिन सर्वत्र रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आयोजित शिबिरात ४० छात्रानी रक्तदान केले .त्यात विदयार्थिनीचा सहभाग लक्षणीय होता.तसेच कॉलेजच्या २० विध्यार्थ्यानी रक्तदान केले.
रक्तदान शिबीर आयोजित केल्या बद्दल अहमदनगर महानगर पालिका रक्तपेढी व आनंदऋषी ब्लडबेंकेच्या वतीने अहमदनगर कॉलेजला प्रमाणपत्र देण्यात आले. उपस्थितांचे स्वागत व आभार एनसीसी विभाग प्रमुख प्रा.एम.एस.जाधव यांनी मानले.