शासकीय ग्रंथोत्सव : परिसंवाद, कथाकथन व कविसंमेलनाचे आयोजन
सांगली, दि. 25, नोव्हेंबर - राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र साहित्य परिषद व संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय व सांगली जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्यावतीने उद्या शनिवार दि. 25 व 26 नोव्हेंबर रोजी शांतिनिकेतन लोकविद्यापीठात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सांगली जिल्हा प्रभारी ग्रंथालय अधिकारी के. एच. पाटील यांनी दिली.
या ग्रंथोत्सवानिमित्त शनिवार दि. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना प्रवेशद्वारासमोर सांगली महापालिकेचे महापौर हारूण शिकलगार यांच्याहस्ते ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार आहे. त्यावेळी शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचे संचालक गौतम पाटील व शिक्षणाधिकारी महेश चोथे उपस्थित राहणार आहेत. सकाळी अकरा वाजता कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याहस्ते या ग्रंथोत्सवाचे उदघाटन होणार आहे. या कार्यक्रमास हारूण शिकलगार, खासदार संजय पाटील, राजू शेट्टी, आमदार मोहनराव कदम, दत्तात्रय सावंत, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, श्रीमती सुमन पाटील, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील, ग्रंथालय संचालनालयाचे संचालक किरण धांडोरे व सहाय्यक ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर आदी उपस्थित राहणार आहेत.
याचदिवशी दुपारी तीन वाजता ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली प्रभावी वाचन माध्यमे या विषयावर परिसंवाद होणार आहे. त्यात प्रा. विष्णू वासमकर, डॉ. अनिल मडके व प्रा. प्रदीप पाटील आदी सहभागी होणार आहेत. दुपारी साडे चार वाजता प्रा. सुभाष कवडे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. रविवार दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता प्राचार्य डी. जी. कणसे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथाने काय दिले या विषयावर परिसंवाद होणार आहे.
या परिसंवादात प्रा. अनिल फाळके, अजिंक्य कुंभार व ऍड. बी. डी. शिंदे आदी सहभागी होणार आहेत. दुपारी दोन वाजता बाबासाहेब परिट यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे. या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा समारोप दुपारी साडे तीन ते साडे चार या कालावधीत सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहितीही के. एच. पाटील यांनी दिली.