Breaking News

जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर

सांगली, दि. 11, नोव्हेंबर - जत येथे दिनांक 13 व 14 डिसेंबर रोजी यल्लामादेवीची यात्रा असल्याने राज्य निवडणूक आयोगाने जत नगरपरिषदेच्या अध्यक्ष व सदस्य पदांच्या  सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. या सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान रविवार, दिनांक 10 डिसेंबर रोजी तर मतमोजणी सोमवार, दिनांक  11 डिसेंबर रोजी होणार आहे.
या निवडणुकीची आचारसंहिता दिनांक 7 नोव्हेंबर रोजीपासून लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. आचारसंहिता सार्वत्रिक निवडणूक  असलेल्या संपूर्ण नगरपरिषद क्षेत्रामध्ये लागू राहील.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे
जिल्हाधिकार्‍यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख - मंगळवार, दिनांक 14 नोव्हेंबर. नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्‍चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याक रिता उपलब्ध असण्याचा कालावधी - गुरूवार, दिनांक 16 नोव्हेंबर ते बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर (सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत). नामनिर्देशनपत्रे स्किारण्याचा कालावधी  गुरूवार, दिनांक 16 नोव्हेंबर ते बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर (सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत), रविवार दिनांक 19 नोव्हेंबर या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार  नाहीत. नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक - गुरूवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11  वाजल्यापासून. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा दिनांक अपील नसेल तेथे - मंगळवार, दिनांक 28 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत, अपील असल्यास अपिलाचा निर्णय ज्या तारखेस  करण्यात येईल. त्या तारखेनंतर तिसर्‍या दिवशी किंवा तत्पूर्वी. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा  दिनांक - उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक - रविवार, दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळी 7.30  वाजल्यापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत. मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक - सोमवार, दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून.