हिंगोली, दि. 11, नोव्हेंबर - हार्वेस्टर मशीनने ऊस काढताना अचानक मशीनला आग लागल्याची घटना घडली. या आगीत 3 एकर ऊस जळून खाक झाला असल्याचे वृत्त आहे. या घटनेत चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात 50 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.