Breaking News

नाशिक शहरात वाळू माफियांकडून तलाठ्यास मारहाण

नाशिक, दि. 07, नोव्हेंबर - नाशकात पुन्हा एकदा वाळू माफियांनी डोके काढले आहे. आज सकाळी शहरातील नागजी चौकात वाळू माफियांकडून तलाठ्यास बेदम मारहाण क रण्यात आल्याची घटना घडली आहे. अधिक माहिती अशी की, गेल्या महिन्यात नासर्डी पुलाजवळ केलेल्या कारवाईच्या पथकात तलाठी होता. त्याचा राग मनात धरून आज सक ाळी आठ वाजेच्या सुमारास सह्याद्री रूग्णालयाजवळ या वाळू माफियांनी बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्या तलाठ्याचे नाव यादव विठ्ठल बच्छाव असे आहे. ते वडनेर दुमाला  देवळाली कॅम्प येथे कार्यरत आहेत. मारहाणीत जखमी झालेल्या बच्छाव यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल उपचार सुरु आहेत. तलाठ्यास मारहाण झाल्यानंतर  जिल्ह्यातील तलाठ्यांनी लेखणी बंद आंदोलनाचा इशारा दिला असून वाळू माफियांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.